रणजीत हालसे यांचे दुःखद निधन ...!!!
-- अत्यंत दुःखद --
आपणा सर्वांचे जिवाभावाचे मित्र..रणजित मुकुंदराव हालसे.. यांचं आज अल्पशा आजराने निधन झाले, सोलापूरच्या रुग्णालयात त्यांच्यावर गेली काही दिवस उपचार सुरू होते, काल पहाटे ब्रेनडेड झालेल्या रणजितने आज अखेरचा श्वास घेतला..
एमए एमफील, नेट जीआरएफ , असलेल्या रणजित यांनी कमी कालावधीत दोन पेट्रोल पंपाच्या माध्यमातून व्यवसायाला सुरुवात केली होती, राष्ट्रवादी काँग्रेसचे ते पदाधिकारी होते, त्यांच्या आई (निवृत्त मुख्याध्यापक ) कुसुमताई ह्या लातुर जिल्हा परिषदेच्या औराद शहाजनी येथून सदस्य आहेत,तर वडील मुकुंद हालसे हे निवृत्त आर्मी ऑफिसर आहेत, रणजित हे एकुलते एक सुपुत्र होते आता त्यांच्या पश्चात तीन बहिणी आणि आई वडील असा परिवार आहे. अत्यंत मन मिळाऊ, व्यवसायिक धडपड करणारे आणि कुटुंब वत्सल असलेले रणजित यांची राज्यभरातील प्रशासकीय व्यवस्थेत शेकडो अधिकारी मित्र होते...
त्यांच्या मदतीतुन त्यातले अनेक जण घडलेही आहेत आणि त्यांनी दलित समाजातील अनेक गोरगरीब परिवारातील मुलांना सढळ हाताने लागेल ती मदत पुरविण्यासाठी पुढाकार घेतलेला दिसुन येत असे.
२००८ मध्ये औराद शहाजानी येथील दलितांवर झालेल्या अन्यायाचा पुढाकार म्हणुन रणजित दादांनी ६० - ७० दलित बांधवाना तब्बल महिनाभर परिश्रम घेऊन सर्वांना तुरूंगातुन बाहेर काढले होते. रणजीत हालसे हे दलित चळवळीतील चांगले अभ्यासक होते. रणजीत हालसे हे कोणत्याही समाजावर अन्याय झाला तर सर्वांसाठी धाऊन जात असत. त्यांच्या आयुष्यामध्ये ते कधीच कोणापुढे झुकले नाहीत. त्यांचा एक खास स्वभाव होता की, ज्यांच्या कडे काहीच नाही त्या व्यक्तीला सर्वात जास्त जवळ करायचे.
रणजित हालसे गेल्या काही दिवसांपासून पोटाच्या आणि मेंदूच्या आजाराने त्रस्त होते त्यातच त्यांचा मृत्यू झाला...रणजित आज आपल्यात नाहीत मात्र त्यांची आठवण आणि सच्चा मित्र कायम समरणात राहील..त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही प्रार्थना..!
Comments
Post a Comment