औराद शा येथे बु. रणजीत हालसे यांची जयंती साजरी !
सवळा वर्ण, धष्टपुष्ट शरीरयष्टी, व्यवस्थित कोरलेल्या हनुवटी कडे मार्गस्थ असणाऱ्या लांब मिश्या, गोंडस बालका सारखे हसू असणारे रणजीत हलसे काहींसाठी रंज्या हलसे परंतु माझ्यासाठी सम्राट हलसे. लातूर जिल्ह्यातील औराद शहाजनीचे रणजीत हलसे त्या काळातल्या जयकरचे सर्वांना प्रिय असलेले व्यक्तिमत्व. लांबून जरी उग्र वाटत असले तरी जवळ गेल्यावर अतिशय उमद्या मनाचा राजा माणूस. रणजीत हलसेंचे बरेच किस्से प्रसिध्द होते. रणजीतचे बसणे, चालणे अशा अनेक गोष्टींवर जनार्धन कांबळे उर्फ जन्या, सिद्धार्थ टेंकाळे उर्फ पाप्या व लातूरचे बरेचसे मित्र वेगवेगळे किस्से सांगायचे. जयकरमध्ये प्रत्येकासोबत सुसंवाद असणारे हे व्यक्तिमत्व. यांनी कायम राज्यसेवाच दिली इतर वर्ग तीनच्या किंवा पीएसआय/एस.टी.आय/असिस्टंट या परीक्षांचे साधे फॉर्म सुध्दा हलसे कधी भरत नव्हते. व्हायचे तर ‘वर्ग एक’ असा त्यांचा संकल्प असावा. कोणी भेटले की त्यांच्या शैलीत शुध्द मराठीत ते सांगायचे हा माझा तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता बरका. असे मिश्कीलपणे कोणाला पहिल्या फळीतला तर कोणाला दुसऱ्या फळीतला स्वतःचा कार्यकर्ता स्वतःच हलसे बनवून टाकायचे. वरून माझा कार्यकर्